
बालोद्यान
बिरनाळे सरांचा कोल्हापुरमधली पुरग्रस्तांना आवाहन केलेला व्हिडीओ.
बरोबर १४ वर्षांनंतर आज पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसलाय. पण यावेळी त्याची तीव्रता गेल्या वेळेपेक्षा अनेकपटीने जास्त आहे. महापुराचा सगळ्यात जास्त फटका बसला तो कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्याला. मदतीचे अनेक हात पुढे सरसावले आहेतच.. पण ही वेळ फक्त सहानभुती दाखवण्याची नाहीये.. ही वेळ आहे उबंटू जगण्याची.. काय आहे उबंटू??

‘फिनिक्स’ गौरी काळे
कोल्हापुरातील हरोली गावातील काळे नावाची बाई एकटीच चार मुलांच्या संसाराचा गाडा ओढत असते. तिची गौरी नावाची मुलगी आपल्या भावंडाची जबाबदारमुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही घेता आले नाही. अश्या दुर्दैवी गौरींना चौकटीतून बाहेर काढण्याचे काम बालोद्यान करत आले आहे. गौरीच्यासोबत तिचा भावंडांना देखील बालोद्यानमध्ये प्रवेश दिला.

शुभम पाटील
आपला शुभम पाटील बालोद्यानच्या घरकुलात लहानाचा मोठा झाला. इथुनच दहावी झाल्यानंतर त्यानं आयटीआय पूर्ण केलं आणि तीन वर्ष इंटर्नशीप आणि नोकरी केल्यानंतर शुभम आता किर्लोस्कर ह्या ख्यातनाम कंपनीत नोकरीस लागला आहे.
सेवा आणि कार्य
त्यांच पालन पोषण
आणि त्यांचा चौफेर विकास
ज्ञानदिप
निवारा
बालोद्यान घरकुल
२००६ संपूर्ण दुर्लक्षित झालेला गावाचा वारसा..