आमच्याविषयी

बालोद्यान हा विद्यार्थी विकास प्रबोधिनी द्वारे चालवला जाणारा अनाथ, वंचित आणि भटक्या मुलांच्या संपूर्ण विकासासाठीचा सामाजिक प्रकल्प आहे. विद्यार्थी विकास प्रबोधिनी ही संस्था नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय संस्था आहे..
बालोद्यान मधील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा पूर्णपणे मोफ़त पुरवल्या जातात..

बालोद्यानचं पहिलं पाऊल आम्ही टाकलं ते लोकसहभागामुळं आणि आज ह्या प्रवासाला ​१० वर्ष पूर्ण होताहेत ते लोकांच्या सोबतीमुळेच.. आम्ही एकत्र येऊन लावलेल्या ह्या रोपटयाचा आता हळूहळू आधारवड होतोय आणि त्याच्या आधारानी काही ‘चिमुकल्या वेली’ उभ्या राहायला लागल्यात. काही ‘चिमुकल्या पक्षांना’ त्यांचं हक्काचं घरटं मिळालंय.

पण ही फक्त सुरवात आहे.. अजून बरंच काही करायचं आहे. त्या साठी तुम्ही आमच्या बरोबर असणं, आमच्या परिवाराचा भाग असणं महत्वाचं आहे. तुमचे विचार, मार्गदर्शन आणि सहभागाची आवशकता आहे.. त्याने बालोद्यान अजुन समृद्ध होऊ शकेल, याचा आम्हाला विश्वास आहेच…

आमचे ध्येय

विद्यार्थ्यांचे संपूर्ण पालकत्व आणि त्यांची जबाबदारी यामधे त्यांचे पालनपोषण, आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्व विकास करियर स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता याचा समावेश आहे.. ही संपूर्ण जबाबदारी संस्थेची आहे..

मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेनं कृतीबद्ध कार्यक्रम आखला आहे आणि त्याद्वारे वाटचाल सुरु आहे.. यामधे त्यांचा शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास अपेक्षित आहे..

बालोद्यान स्वयंसेवा करण्याच्या आपल्या स्वारस्याबद्दल धन्यवाद आणि निश्चितपणे आपण फरक करू शकता.

चला.. कुणाचे तरी पंख होऊया..

बालोद्यान, अब्दुल लाट, जिल्हा कोल्हापुर, महाराष्ट्र ४१६१३०
+ 91 – 9881201232 / 9766038899
editor@balodyan.org